तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते?

तुळसी विवाह
महत्व –
भगवान श्रीविष्णूचा तुळशीसोबत विवाह लावण्याचा हा उत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे, तुळस ही लक्ष्मी स्वरुप मानली जाते. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते.

शास्त्रीय करण-
मानवी जीवनात तुळशीचे खूप मोठे महत्व आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचा नाश करते.
तुळस मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड हा विषारी वायू शोषून, शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. तसेच पहाटेच्यावेळी ओझोन वायुही सोडते. आयुर्वेदातही तुळशीला फार महत्व आहे.

ह्या दिवशी तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करतात. तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार चढवतात. बोरं, चिंच, आवळा, कवठ कुंडीत ठेवतात. मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवतात.
वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणाप्रमाणे तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे.

विधी व पूजा-
१.आचमन करून संकल्प केला जातो.
२.षोडशोपचारे गणपती पूजन केले जाते.
३.तुळशीची व कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते.
४.तुळशीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करतात.
५.त्यानंतर बाळकृष्ण व तुळस यांच्या मध्यभागी अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणतात.
६. महानैवेद्य व आरती करून मंत्रपुष्पांजली वाहतात.

तुळशीला आणि बालकृष्णला गोडाचा नैवेद्य व फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील सवाष्ण स्त्री खण नारळाने तुळशीची ओटी भरुन प्रार्थना करते.
ह्या दिवशी दीपोत्सव करून फटाके उडवून मोठया आनंदाने उत्सव साजरा करतात.

विधीयुक्त षोडशोपचारे तुलसी पूजन करण्यासाठी गुरूजी ऑन डिमांड च्या संकेत स्थळाला भेट द्या आणि तुलसी विवाह ची वेळ आजच नोंदवा.

प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी सुरक्षित पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – 9130600429
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!

©️

तुळशीची आरती

जय देवी जय देवी जय माये तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।