यंदाच्या दिवाळीमध्ये करा आरोग्यलक्ष्मीची पूजा!

दीपावली उत्सव

दिवाळी, दीपावली, दीपोत्सव अशा वेगवेगळ्या नावाने ह्या उत्सवाची ओळख आहे.
दिवाळीला सर्वत्र दिवे-पणत्या लावतात. वसुबारस, आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन), कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) व यमद्वितीया म्हणजे भाऊबीज असे सहा दिवस दिवाळी साजरी केली जाते. तसेच आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.

Book your Guruji for puja along with puja-samagri on www.gurujiondemand.com

दीपावली शास्त्र

कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी लक्ष्मी पूजन करतात. तसेच आरोग्यलक्ष्मी म्हणजे केरसुणी पुजतात.
बलीप्रतिपदा दैत्यराज बलीचा नाश करुन त्रस्त जनतेची सुटका केल्याच्या उत्सवाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात.

१.वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

२.धनत्रयोदशी
अश्विन कृष्ण त्रयोदशीस हा सण साजरा केला जातो.आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. यादिवशी धन्वंतरीची पूजा करतात. तसेच गुप्तधनाची किंवा पिढ्यानपिढ्या जपलेल्या धनाची पुजा केली जाते.

३. नरकचतुर्दशी- यादिवशी पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. यालाच बोलीभाषेत पहिली आंघोळ म्हणले जाते. तसेच घरात अपमृत्यु टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते.

४. लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. देवी लक्ष्मी ला कुंकुमार्चन अभिषेक केले जाते. तसेच आरोग्यलक्ष्मी म्हणजेच केरसुणीची पुजा केली जाते.

५. बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी दैत्यराजा बळीचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. कारण भगवान विष्णुअवतार वामनाने बळीला पाताळात गाडले तेव्हा त्याला असा वर दिला कि या दिवशी भूतलावर तुझे पुजन केले जाईल. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
ह्या दिवसाला विशेष महत्व आहे म्हणजेच आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.
यादिवशी व्यापारी लोक वही पूजन म्हणजेच सरस्वती पूजन करतात. यालाच चोपडी पूजन देखील म्हणतात.
तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते त्यानिमित्ताने लोक सत्यनारायण पूजा देखील करतात.

६. भाऊबीज / यमद्वितीया
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बहिणभावाच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.

संपूर्ण दीपावली उत्सवात धन्वंतरी पूजन , लक्ष्मी पूजन, वही / सरस्वती पूजन सत्यनारायण पूजा तसेच विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात.

©️ Guruji On Demand