अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाणारे कोजागिरी पौर्णिमा व्रत…

अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय. लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा केली जाते.

अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ ही येणाऱ्या
30 ऑक्टोबर 2020 रोजी येत आहे.
कोजागिरी उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ ह्या वेळेमध्ये केला जातो.
इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची मनोभावे पूजा केली जाते.

kojagiri pornima vrat

https://gurujiondemand.com/

ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते , बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.

चंद्राची किरणे पडलेले दूध आरोग्यासाठी खूप उपायकारक असते असे मानले जाते।ल.

  • पूजाविधी मांडणी :-

मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या पानावर सुपारी ठेवावी
२) विड्याच्या पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या, त्यात आंब्याचा डहाला घ्यावा.
अशी मांडणी मुहूर्ताच्या आधी करून ठेवावी. दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे.

४) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुधामध्ये एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा

शक्य झाल्यास गायत्री मंत्राचे पठाण करावे. तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा वाचावा.
दुधाचा नैवेद्य उपस्थित व्यक्तींनी घ्यावा.

लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर ह्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक मनोभावे पूजा करतात.

©️ Guruji On Demand